NIKON Z MOUNT 85MM F/1.2s Z MOUNT ची लेन्स निकॉन ने मिररलेस कॅमेर्यासाठी भारतामध्ये लॉंच केली आहे, या लेन्स मध्ये संपूर्ण नवीन टेकक्नोलोजी वापरली आहे, निकॉन झेड 85MM F/1.2 S लेन्सची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
फोटोग्राफर आणि सिनेम्याटोग्राफर ची सर्वात पसंती ची लेन्स Nikon 85mm ला निकॉनने नवीन फीचर्स सह Z सिरिज मध्ये F/1.2 अप्रेचर मध्ये लॉंच केली आहे, त्यामुळे Nikon 85mm पहिल्या पेक्षा जास्त डेफ्ट ऑफ फिल्ड मध्ये काम करील आणि निकॉन 85MM F/1.8 पेक्षा जास्त फास्ट, शार्प आणि परफेक्ट फोटो काढण्यासाठी सक्षम झाली आहे.
सर्व कॅमेरा कंपनी 1.4 अप्रेचरच्या खाली म्हणजे 1.2 अप्रेचर असलेल्या लेन्स बनवायला सुरवात केली आहे. DSLR माऊंट कॅमेर्याच्या काळात लेन्स सेन्सर मध्ये जास्त अंतर होते पण जसे मिररलेस कॅमेर्यामध्ये लेन्स आणि सेन्सर चे डिस्टन्स कमी झाले आहे, मिरर बॉक्स आणि प्रिजम नसल्या कारणाने कॅमेर्याचे वजन कमी झाले आहे,
त्यामळे मिररलेस कॅमेर्याची प्रॉडक्शन कॉस्ट वर फरक पडला आहे, सुरवातीला DSLR कॅमेर्याची जास्तीत जास्त शटर स्पीड 1/4000 किंवा 1/8000 होती पण DSLR च्या काळात ती सर्वात जास्त एड्व्हांस आणि फास्ट होती, पण जस जसा काळ बदलला कॅमेर्याचे शटर स्पीड वाढत गेले ते आता खूप फास्ट झाले आहे, ते शटर स्पीड आता 1/16000 ते 1/32000 पेक्षा जास्त झाले आहे.
टेकक्निकली याचा अर्थ असा आहे की आपण खूप जास्त प्रकाशात ND फिल्टर चा वापर न करता आपले शटर स्पीड वाढवून असे फोटो काढू शकता की ज्याचा आपण विचार देखील केला नसेल, अजून महत्वाचे मुद्दे बाकी आहे, त्यामुळे पुढे माहिती संपूर्ण वाचा.
SPECIFICATIONS
NIKON Z 85MM F/1.2s LENS एक हेवी कन्सट्रक्षण आणि सुंदर बिल्ट क्वालिटी मध्ये बनवली गेली आहे, 85mm या लेन्स मध्ये 15 एलिमेंट आणि 10 ग्रुप ची एक जबरदस्त कन्सट्रक्षण आहे, इतक्या मोठ्या एलिमेंटला फिरवण्यासाठी या लेन्स मध्ये ड्युल प्लस मोटरला बसवण्यात आले आहे, ड्युल प्लस मोटर मुळे कोणत्याही प्रकारच्या बॅक फोकस किंवा फ्रंट फोकसच्या प्रॉब्लेम शिवाय F 1.2 अप्रेचर वर किलियर आणि शार्प फोटो व व्हिडीओ देण्यासाठी सक्षम आहे.
85mm च्या फिल्टर सहित महागातील ND फिल्टर या लेन्स सोबत आपण वापरू शकतो, 15 ब्लेड या पावर फुल्ल अप्रेचर सिस्टम या लेन्स मध्ये वापरल्यामुळे आपल्याला फुल्ल बुके इफेक्ट आपल्या फोटो मध्ये पहवयास मिळणारआहे.
- MINIMUM FOCUS DISTANCE – 2.79ft
- AUTOFOCUS – Yes
- MOUNT TYPE – Nikon Z Mount
- MAXIMUM APERTURE – f/1.2
- MINIMUM APERTURE – f/16
- FOCAL LENGTH – 85mm
- FILTER SIZE – 82 mm
- COATING – Nano Crystal Coat
- LENS WEIGHT – Approx. 1160 g
LENS MAIN FEATURES
- फास्ट फोकसिंग
- फोकस लॉक बटन
- शार्प ईमेज
- ऑटो फोकस
- ड्युल प्लस मोटर
NIKON Z 85MM F/1.2 S लेन्सला L.Fn नावाने एक फोकस लॉक बटन लेन्स वर दिले आहे, ज्याचा वापर करून आपण सब्जेक्ट फास्ट फोकस करू शकतो, शिवाय लेन्स आपण मनुअल आणि ऑटो फोकस मोड मध्ये वापरु शकतो,
BEST FOR USE
85MM 1.2s ही लेन्स आपण वेडिंग फोटोग्राफी, पोट्रेट व व्हिडीओ सिनेम्याटोग्राफीसाठी वापरू शकतो, या लेन्सचे अप्रेचर F/1.2 पासून F/16 पर्यन्त आहे, ही लेन्स Z सिरिज मध्ये फास्ट आणि शार्प लेन्स आहे.
ही पण पोस्ट तुम्ही वाचा Best Monitor For Photo Editing And Video Editing
Nikon Z8 लॉन्च वाचा संपूर्ण माहिती Nikon Z8 Best Mirrorless Camera In 2023
Nikon 85mm 1.2 s Price In India
भारता मध्ये 85mm lens ची किंमत निकॉन कंपनी ने MRP मध्ये Rs. 257,995.00/- इतकी ठेवली आहे, 85mm ही लेन्स आपल्याला 2 लाख ते 2.25 लाखा पर्यन्त ऑफ लाईन मार्केटमध्ये मिळू शकते. ही माहिती अवडली असेल तर कमेंट करा आणि इतरांना ही शेयर करा.